crime News  saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : नाशकात चाललंय तरी काय? सातपुरात दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार

नाशिकच्या सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. नाशिकच्या सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेनंतर सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले यासह गोळीबार केला. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कामगाराची दुचाकी पळवली

घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी घेऊन आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

नाशिक (Nashik) शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहीले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हेशाखा, सातपूर पोलिसांसह (Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT