Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये खळबळ; एकाच कुटुंबातील ३ जणांची आत्महत्या

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik Crime News : नाशिकमधून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील (Nashik) सातपूर परिसरातील अशोक नगर भागात एकच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. घटनेने अशोक नगरच्या बोलकर व्हॅली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना (Police) मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण खासगी सावकारकीचा त्रास असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. दीपक शिरोडे(वय ५५), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५ ),राकेश शिरोडे (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.

दीपक शिरोडे(वय 55),मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५ ),राकेश शिरोडे (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत राहत्या घरात वेगवेगळ्या खोलीत तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मयत दीपक शिरोडे यांचा अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांची पत्नी व आई दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या,त्या घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर शहरात कोणालाही खासगी सावकारकीतून त्रास दिला जात असल्यास त्यांनी तात्काळ शहर पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल असे आव्हान देखील यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT