crime news  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा; 'या' कारणासाठी १३ वर्षाच्या मुलाने केली हत्या

नाशिकमधून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. अवघ्या १३ वर्षीय मुलाने स्वत:च्या ४ वर्षीय बालकाचा हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik Crime News : नाशिकमधून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. अवघ्या १३ वर्षीय मुलाने स्वत:च्या ४ वर्षीय बालकाचा हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या अंजनेरी येथील आधारतिर्थ आश्रमातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आधारतीर्थ आश्रमातील १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आधारतीर्थ आश्रमातील अलोक शिंगारे या चार वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आले होते. या हत्येप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाले होते. ठोस पुरावे मिळत नसल्याने हत्येच्या गुन्हाचा उलगडा होत नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा गुन्ह्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आश्रममध्ये अलोक आणि त्याचा मोठा भाऊ राहतो. याच आश्रमात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा आलोकच्या मोठ्या भावाशी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आलोकची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्येचा उलगडा झाल्याने आधारतीर्थ आश्रमात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT