Nashik News Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik City Bus: बस जोरात खड्ड्यात आदळली, प्रवाशाच्या पोटाला बसला जबर मार; जागेवरच जीव सोडला

Nashik City Bus Hits Pothole Passenger Dies: नाशिक सिटी बस खड्ड्यात जोरात आदळली. ज्यात प्रवाशाच्या पोटाला जबर मार बसला. पोटाला जोरात मार बसल्यानं प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. चालकाविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच आहे. सिटी लिंक बस खड्ड्यात आदळल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. बस खड्ड्यात जोरात आदळली. खड्ड्यात बस जोरात आदळल्यानं प्रवासी सीटच्या पाठीमागील भागावर जोरात उडून पोटावर पडले. यात त्यांच्या पोटाला जबर मार बसला. पोटाला जोरात मार बसल्यानं प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खड्ड्यात बस आदळल्यानं एका प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. संतोष माळी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सिटी बसमधून संतोष माळी आणि त्यांच्या पत्नी प्रवास करत होते. मात्र, एका खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. बस रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या मधोमध एक खड्डा आला होता.

खड्ड्यातून सिटी बस जात असताना जोरात आदळली. बस जोरात आदळल्यानं संतोष माळी हे सीटच्या पाठीमागील भागावर जोरात उडून पोटावर पडले. पोटाला जबर मार बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतोष माळी यांच्या पत्नी माया माळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल केल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी सिटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर खड्ड्यांमुळे आणखी किती निष्पाप जीवांचे प्राण जाणार? किती प्रवाशांना दुखापत सहन करावं लागणार? असा संतप्त सवाल नागरीकांकडून विचारण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

जीमचा नाद, जीवन बरबाद? अतिव्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला

SCROLL FOR NEXT