Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: 'सदावर्ते झाले आता राज ठाकरे आलेत, वाट लावणार सगळ्या महाराष्ट्राची'

भाेंग्याच्या प्रश्नावर महाराष्ट्रात धर्मा धर्मात सध्या तेल घालण्याचे काम सुरु आहे असे नागरिकांना वाटू लागले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : राज ठाकरे (raj thackeray) हे दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. आमची एकजूट फाेडण्याचे काम त्यांनी बंद करावे असे आवाहन नाशिक येथील हिंदु आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी मनसे (mns) प्रमुख राज ठाकरेंना केले आहे. (nashik latest marathi news)

भाेंग्याच्या (loudspeaker) प्रश्नावर महाराष्ट्रात धर्मा धर्मात सध्या तेल घालण्याचे काम सुरु आहे असे नागरिकांना वाटू लागले आहे. आज शहरात हिंदू मुस्लिम एकत्रित नांदत आहेत. एकमेकांना भडकाविण्याचे काम बंद करावे अशी भावना हिंदु धर्मातील नागरिकांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी लाेकांना भडकविणे बंद केले नाही तर शांततेचा भंग हाेईल असेही नागरिकांना वाटत आहे. ग्रामीण भागात काकड आरती, रात्री किर्तन हाेत असते. काेणीही त्यास आक्षेप घेत नाही. मग राज ठाकरेंना काय पडले आहे हेच समजत नाही असेही नागरिकांनी नमूद केले.

मुस्लिम धर्मातील नागरिक म्हणाले राज ठाकरे हा काही ठाकरे नाहीच. ठाकरे केवळ एकच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव. आज ते राज्याचा कारभार याेग्य पद्धतीने चालवत आहेत. त्यांचा कारभार राज ठाकरेंना दिसत नाही का असा सवाल करण्यात आला आहे. त्यांनी दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम बंद करावे असेही नमूद केले. दरम्यान जेव्हापासून पहाटेचे सरकार पडले त्यावेळी पासून काही लाेकांच्या झाेपा उडाल्या. त्यामुळे सुपारीबाज राजकारण करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्राची आणि एसटी महामंडळाची वाट लावणारे सदावर्ते गेले आणि राज ठाकरे आले असे म्हणावे लागेल असेही काही मुस्लिम समाजातील नागरिकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

SCROLL FOR NEXT