Nashik Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Bus Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू

Nashik Latest News : नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघातात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अजय सोनावणे

Nashik Latest News : नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नाशिक-चावंड तालुक्यातील आसरखेडा जवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाणी गडावरून मनमाडकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला चांदवड जवळच्या मतेवाडी जवळ अपघात होऊन यात महिला कंडकटरचा मृत्यू झाला आहे. बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस जोरात झाडावर आदळली.

या अपघातात 4 ते 5 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर काही प्रवाशांना मार लागलाय. या सर्व प्रवाशांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एसटी बसचा अक्षरशः चुराडा झाला आहे. (Latest Marathi News)

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात आजीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

दरम्यान, आज मुंबई-गोवा महामार्गावर देखील भीषण अपघात झाला आहे. येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आजीसह दोन लहानग्या नातवांचा समावेश आहे. माणगाव तालुक्यातील कशेणे गाव हद्दीत हा अपघात झाला.

मुंबईतील बोरिवली येथे राहणारे तावडे कुटुंबीय आपल्या कारमधून बोरिवली येथून देवगडला जात होते. दरम्यान माणगावमधील कशेणे गाव हद्दीत त्यांची कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT