Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : चाकूने वार करत जमीन व्यावसायिकाची हत्या; चांदवड तालुक्यातील घटना

Nashik News : राजू शिंदे हे नावाजलेले व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुगाव येथे खुनाचा घटना घडली आहे. या घटनेत (Nashik) जमीन व्यावसायिक राजू शिंदे यांच्यवर चाकूने वार करून निर्घृण हत्या (Chandwad) करण्यात आल्याची घटना घडली. (Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू शिंदे (वय ४५) यांच्या छाती, मांडी, मानेवर चाकूने वार करण्यात आले. (Crime News) चाकूने वार केल्यानंतर शिंदे हे जमिनीवर कोसळले. घटनेत गंभीर जखमी शिंदे यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित केले. राजू शिंदे हे नावाजलेले व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूर्व वैमनस्यातून वार केल्याचा संशय 

शिंदे यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर संबंधित व्यक्ती पसार झाला. हत्या करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये १० व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

Saam Tv Exit Poll: मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंना किती जागा? पाहा सत्तेत कोण येणार

Exit Poll : अजित पवारच दादा! अहिल्यानगरमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर, स्वतंत्र लढलेल्या शिंदेंचं काय होणार?

Saam TV exit poll: सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेना झटका, काँग्रेसला फक्त १२ जागा, वाचा एक्झिट पोलमध्ये येणार कोणाची सत्ता?

Saam Tv Exit Poll: ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा, इचलकरंजीकरांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा इक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT