Nashik ST Bus Fire Latest News  Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : नाशकात पुन्हा दुर्घटना! सप्तश्रृंगी गडावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या ST बसला आग

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik ST Bus Fire Latest News : नाशिकमध्ये (Nashik) एका खासगी बसला आग लागून मोठी दुर्घटना (Accident) घडल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती. (Nashik News Today)

सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान, एसटी बसला आग लागल्याची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज (शनिवार) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत डेपोची प्रवाशांना घेऊन श्री सप्तशृंगी गडाकडे निघाली होती. बस ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ आली असता, अचानक बसला आग लागली. बसला आग लागल्याची कळताच, चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले.

आगीची माहिती मिळताच, स्थानिकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली.सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत.

भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिका तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

SCROLL FOR NEXT