Nashik Mobile Blast Saamtv
महाराष्ट्र

Nashik Mobile Blast: मोबाईलच्या स्फोटाने नाशिक हादरलं! घरांच्या काचा फुटल्या, ३ जण जखमी

Nashik News Update: स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्या.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी

Nashik Mobile Blast:

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना नाशिकमधून (Nashik) उघडकीस आली आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप अशी जखमींची नावे आहेत. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्या.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनीही (Nashik Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोट कसा झाला याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरातील नागरिंकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT