Nashik Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: हुल्लडबाज पर्यटकांना दणका! नाशिक पोलिसांकडून ९१ जणांवर कारवाई; ७३ हजारांचा दंड वसूल

Nashik Latest News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तसच पहीने परिसरातील धबधब्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काल विकेंडलाही याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २२ जुलै २०२४

सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या बॅटिंगमुळे धरणे, नद्यांवरील प्रेक्षणीय स्थळे खुलली असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजांना आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांविरोधात नाशिक पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तसच पहीने परिसरातील धबधब्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काल विकेंडलाही याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिने धबधब्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या ९१ जणांवर कारवाई केली असून ७३ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ९ मद्यपींवर, ७८ जणांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत तर १० जणांवर टवाळखोरी तसेच गैरवर्तन प्रकरणी कारवाई केली आहे. त्र्यंबकेश्वर पहिले परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी करून पोलिसांनी तपासणी करुन कारवाई केली.

दरम्यान, लोणावळ्यामध्येही पर्यटकांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. सहारा ब्रिज ते लोणावळा दरम्यान असलेल्या मार्गावर धोकादायक वाहतूक करताना एक जेसीबी चालक काही हुल्लडबाज पर्यटकांना जेसीबीच्या बँकेट मध्ये बसवून प्रवास करताना दिसून आला आहे..अश्या हुल्लडबाज जेसीबी चालकांवर लोणावळा पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचं आहे..थोड्याश्या पैशासाठी स्वतःसह पर्यटकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचे लोणावळ्यात दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...

Dahi Vada Recipe: साऊथ इंडियन स्टाईल दही वडा कसा बनवायचा?

Jio Cheapest Plan: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! कमी किमतीत २८ दिवसांचे पाच बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना, काम कसं करणार?

SCROLL FOR NEXT