Nashik Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: शेतात काम सुरू असताना मोठी दुर्घटना! अंदाज न आल्याने डंपर विहिरीत पडला; चालकाचा दुर्दैवी अंत

Nashik Breaking News: शेतामध्ये लेवल करण्याचे काम सुरू असताना डंपर कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक|ता. २६ मे २०२४

शेतामध्ये खोदकाम सुरू असताना अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडली. या दुर्घटनेत डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडलेल्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रब्बी हंगाम संपवून खरीप हंगामाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची मशागत, बि- बियाणांची खरेदी तसेच शेतातील विहिर, पाणी साठ्याच्या उपाययोजना करण्यात बळीराजा व्यक्त आहे. अशातच शेतामध्ये लेव्हल करण्याचे काम सुरू असताना डंपर कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण गावात शेतीच्या सपाटी करणाचे काम सुरू होते. त्यासाठी डंपर लावण्यात आले होते. यावेळी सपाटीकरण करण्यासाठी माती टाकत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत पडला. यामध्ये डंपर चालक अक्षय दळवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस अधिक तपास करत आहेत

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने उसाचे पीक पाण्याअभावी जळून गेले आहे. मागील अनेक दिवसापासून पाणीच नसल्याने ऊस जागीच जळून गेल्याची स्थिती सोलापुरात सर्वत्र पाहायला मिळतेय.त्यामुळं उसाच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT