nashik police Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: पाववड्याचे पैसे मागितल्याचा राग, तरुणांकडून दुकानाची जबरदस्त तोडफोड, कोयता नाचवून दहशत

Youth Attack Bakery Owner : नाशिकमध्ये उपनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरातील सर्व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक :नाशिक शहरातील उपनगर भागातील सँडी बेकरीमध्ये दोन तरुणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पाववडे खाल्ल्यानंतर पैसे न देता निघून जाणाऱ्या या तरुणांना दुकानदाराने पैसे मागितले असता, त्यांनी संतप्त होऊन कोयत्याच्या सहाय्याने संपूर्ण दुकानाची तोडफोड केली.

उपनगर हा अत्यंत रहदारीचा भाग असून, येथे अनेक व्यापारी दुकाने, शाळा आणि कोचिंग क्लासेस आहेत. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या उपनगर नाका परिसरात ही घटना घडली. काल दुपारच्या सुमारास दोन तरुण सँडी बेकरीमध्ये नाश्ता करण्यासाठी आले. त्यांनी दोन पाववडे घेतले आणि खाल्ल्यानंतर पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकान चालकाने त्यांना पैसे मागितले असता, दोघांनी कोयता काढून दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात बेकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर दुकान चालकाने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोघांना ताब्यात घेतले व उपनगर परिसरात त्यांची धिंड काढली.उपनगर परिसरात यापूर्वीही खून, दरोडे, आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या परिसरात अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:- कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात मिळाला पावसाळ्याचा अनुभव

Vande Bharat Express : मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा सुधारित वेळ काय?

रिलायन्स कम्युनिकेशन्स कर्ज घोटाळा प्रकरण; २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, CBIची मोठी कारवाई

Mango for diabetics: डायबेटिस रुग्णांनी आंबा खावा की नाही? डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

Weight Loss Recipe : वजन कमी करायचंय; 'हा' पदार्थ आतापासून खायला सुरूवात करा, उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा

SCROLL FOR NEXT