अशोक खरातच्या दरबारात ४० आमदारांचा वावर असल्याचा धक्कादायक खुलासा
‘अलिबाबा’ नावाचा रहस्यमय मध्यस्थ चर्चेत
राजकीय संबंधांमुळे प्रकरण अधिक गंभीर
वासनांध आणि हवाला रॅकेटचा मास्टरमाईंड असणाऱ्या खरातमुळे राजकारण्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. कधीकाळी खरातच्या दरबारी राबता असणाऱ्या राजकीय नेत्यांचं पॉलिटिकल करिअरचं खरातमुळे दावणीला लागलयं. एकीकडे रुपाली चाकणकरांचा राजीनामा असो वा दीपक केसरकारांचा बचावात्मक पवित्रा खरात प्रकरणानं सत्तेच्या खुर्च्याही हलवून सोडल्यात. आता आमदार केसरकराचं हे विधान ऐका.
दरम्यान खरातचे हे कारनामे माहित असते तर त्याच्याशी संबंध ठेवले असते का?, असं सांगताना केसरकरांनी राज्यातील 40 आमदार खरातला भेटल्याचा मोठा गौप्यस्फोट केलाय..यावर खरातला राजमान्यता होती, असा पलटवार खासदार संजय राऊतांनी केलाय.
राज्यात भोंदू खरातसोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावं समोर येतायत. अशातच रुपाली चाकणकरांचे खरातसोबतचे व्हिडिओ समोर आल्यानं त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागलाय. अशातच 40 आमदारांनीही त्याची भेट घेतलेली असेल तर त्यांना खरातकडे घेऊन जाणारा हा अलिबाबा कोण? सत्तेच्या आडून खरातसारख्या भोंदूबाबाला राजाश्रय देणाऱ्यांचाही चाकणकरांप्रमाणे राजीनामा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.