Fake godman Kharat’s bizarre claims exposed during investigation in Nashik case. 
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

Ashok Kharat : खरात शाकाहारी आणि जैन धर्मीयांना मासा ‘पाण्यातील वनस्पती’ असल्याचं सांगून खायला लावत होता.भविष्य सांगण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून विचित्र दावे करायचा.

Bharat Jadhav

  • भोंदू खरातचा धक्कादायक नवा कारनामा उघड

  • मासा ‘पाण्यातील वनस्पती’ असल्याचा दावा

  • जैन आणि शाकाहारी लोकांना लक्ष्य

नाशिकमधील भोंदू अशोक खरातची अनेक काळे कृत्य समोर आली आहेत. लैंगिक अत्याचार व कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची आज पोलीस कोठडी संपली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना एसआयटीनं त्याच्याकडून अजून माहिती मिळवली असून त्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

भविष्य व ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली शाकाहारी व जैन धर्मीयांना मासे खाण्याचा सल्ला द्यायचा. नुसता सल्लाच नाही तर त्याने त्यांना मासे खायायला सुद्धा दिल्याची माहिती उघड झाली आहे. मासा 'पाण्यातली वनस्पती' असल्याचे सांगून तो त्यांना मासे खाण्यास भाग पडत. लोकांना फसवण्यासाठी खरात वेगवेगळ्या युक्त्या वापरायचा. कोणाला मध, तर नाग देवतेची भीती घालायचा. महिलांना गुंगीचं औषध देून त्यांच्याव र अत्याचार करायचा.

आता खरातचा असा प्रकार उघडकीस आलाय जो ऐकून अनेकांना धक्का बसलाय. मासा हा पाण्यातली वनस्पती आहे, असं सांगून खरातने अनेक शाकाहारी लोकांना प्रसाद म्हणून मासा खाण्यास सांगायचा. मासा कापला त्याला तर रक्त येत नाही. माश्यामध्ये हाडं नसतात. मासे तर पाण्यातली वनस्पती, आहेत, असं ब्रह्मज्ञान खरात पाजळायचा. खरातने काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवलं असून त्यांना मासे खायायला लावली. त्यांच्याकडून लाखो रूपयांची रक्कम लुबाडली आहे.

खरातचा आयकर विभागाला देखील गंडा?

भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे, मात्र फक्त १२ कोटींचे उत्पन्न दाखवून तो त्याचा आयकर भरायचा. आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील होणार चौकशी?

खरातचे राजकीय नेत्यांची हितसंबंध होते, हे समारे आले असतानाच, आता याप्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यासह अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाडींचा शोध घेतला जाणार आहे. सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यात हजर होते, अशी माहिती SIT कडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

SCROLL FOR NEXT