नाशिक जळीतकांड प्रकरण तरबेज शेख
महाराष्ट्र

हट्टापायी प्रेम जाळलं! होरपळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईने डे दिवशीचं मृत्यू

देवळा तालुक्यातील लाेहाेणेर येथील जळीतकांड प्रकरणातील भाजलेल्या गोरख बच्छाव या तरुणाचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

तरबेज शेख, अभिजित सोनावणे

नाशिक: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीचं जुन्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक मधून समोर आली आहे. प्रेम प्रकरण संपल्यानंतरही प्रियकर लग्नात अडथळा आणत असल्यानं प्रेयसीनं कुटूंबियांच्या मदतीनं प्रियकराला जिवंत जाळलं. जगभरात आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना नाशिकमधून मात्र एक दुर्दैवी बातमी आहे.. देवळा तालुक्यातील लाेहाेणेर येथील जळीतकांड प्रकरणातील भाजलेल्या गोरख काशीनाथ बच्छाव या तरुणाचा वेलेन्टाइन डेच्या दिवशी  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 प्रेमप्रकरणातून शुक्रवारी प्रेयसी आणि तिच्या घरच्यांनी गाेरखला बेदम मारहाण करत जिवंत जाळले हाेते. या घटनेनंतर मुलाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना अटक केली आहे.

या घटनेत हा युवक 80 टक्क्यांहून अधिक भाजला हाेता दोन दिवस मुत्यूशी झुंज देत असताना शेवटी त्याचा प्रवास संपला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहेप्रेमप्रकरणातून शुक्रवारी प्रेयसी आणि तिच्या घरच्यांनी गाेरख बच्छाव या तरुणाला बेदम मारहाण करत जिवंत जाळले हाेते. या घटनेनंतर मुलाला नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना अटक केली आहे. (Nashik Crime News)

"तू लोहनेर येथे थांब, आम्ही पंचायत जवळ आलो";

मात्र, संबंधितांना तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली असावी असा अंदाज व्यक्त करत तिचा विवाह मोडण्यात आला. याचा राग अनावर होऊन तिच्या घरच्यांनी गोरख बच्छावला शिवीगाळ केली. याबाबत त्याने काही संबंध नसून मी आजही हे लग्न करण्यास तयार आहे, असे सांगत राहिल्याने युवतीच्या घरच्यांनी ‘तू लोहनेर येथे थांब, आम्ही पंचायत जवळ आलो’ असे सांगून त्याला बोलावून घेतले.

व्हिडीओ-

युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले;

त्यानंतर तिचे आई, वडील, भाऊ यांनी गोरखच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला जखमी केले आणि संबंधित युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामुळे युवक ५५ टक्के भाजला गेला होता. त्यास तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथून नाशिक येथे हलविण्यात आले. कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोगल सोनवणे (वय ५७), निर्मला सोनवणे (वय ५२), हेमंत सोनवणे (वय ३०) आणि प्रसाद सोनवणे (वय १८) अशी तरुणाला जिवंत जाळणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT