Ambad Police Station,  Saam Tv
महाराष्ट्र

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

खासगी क्लास घेणाऱ्याच्या पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आराेप पीडित महिलेने शिक्षणाधिकाऱ्यावर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेज शेख

नाशिक: खासगी क्लास घेणाऱ्याच्या पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आराेप पीडित महिलेने शिक्षणाधिकाऱ्यावर केला आहे. यासंदर्भाय  माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे यांच्याविरोधात अंबड पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दित तिचे पती खासगी क्लास चालवतात. त्याचवेळी महिलेला तिचा पती त्रास देत होता. नवर्‍याची तक्रार करण्यासाठी ही महिला तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांच्याकडे गेल्या. यानंतर त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर भेटीगाठींमध्ये झाले आणि मलाही पत्नीला घटस्फोट द्यायचा असून त्यानंतर आपण लग्न करु, असे आश्वासन अहिरे यांनी महिलेला दिले.

हे देखील पहा-

ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत अहिरे यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लग्न करण्यास टाळाटाळ करत शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेनेे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास महिला उपनिरीक्षक फडोळ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

SCROLL FOR NEXT