nashik breaking news  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : नाशकात दोन वाहनांची धडक; भीषण अपघातात पोलीस कर्मचारी जागीच ठार

नाशिकच्या येवला तालुक्यात येवला-नांदगाव रस्त्यावर पन्हाळ फाटा येथे एका वळणावर दोन वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यात येवला-नांदगाव रस्त्यावर पन्हाळ फाटा येथे एका वळणावर दोन वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik) येवला तालुक्यातील येवला-नांदगाव रस्त्यावर पन्हाळ फाटा येथे एका वळणावर दोन वाहनात झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी दिपक पाटील यांचा मृत्यू झाला आहे. पाटील हे नांदगाव येथून कामानिमित्त येवला येथे जात असताना पन्हाळफाटा येथे समोरुन येत असलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक त्यांच्या कारला (Car) बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दिपक पाटील हे नांदगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले तर हा अपघात येवला हद्दीत झाल्याने येवला तालूका पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येऊन पोलिस अपघाताची अधिक चोकशी करीत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

Rahul Gandhi Protest: राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन चिघळलं, PHOTO

Wednesday Horoscope : संयम ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींचे कामाचे मार्ग मोकळे होणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT