Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चारजण गंभीर, मृतांमध्ये पाचोऱ्यातील एकाचा समावेश

Nashik News : नांदगाव - मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक : भरधाव वेगाने येणाऱ्या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नांदगाव - मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात हा भीषण (Accident) अपघात झाला आहे. या अपघातात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले. सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातातील मृत व जखमी हे (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

अपघातात शिवाजी भास्कर देशमुख (वय ६०, रा.मोहाडी, जि. नाशिक) व उषा नारायण महाजन (वय ६०, पाचोरा, जि.जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये आशा शिवाजी देशमुख, विकास शिवाजी देशमुख, गयाबाई आदिक देशमुख (सर्व राहणार मोहाडी, नाशिक) व नारायण सुकदेव महाजन (रा. पाचोरा, जळगाव) यांचा समावेश आहे. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

सुनेत्रा पवारांची सभा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची एंट्री, पाहा VIDEO

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

SCROLL FOR NEXT