तरबेज शेख , साम प्रतिनिधी
नाशिकमधील सिटी लिंक बस डेपोच्या आवारात सिटी लिंक बसने एका पाच वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना घडलीय. हा अपघात गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बस डेपोच्या आवारात घडला. दरम्यान या अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरुन फरार झालाय. अपघात घडला तेव्हा बस चालक हा दारू प्यायला असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केलाय.
संतप्त झालेल्या जमावाने सिटी लिंक बस व्यवस्थापनाला धारेवर धरलंय. दरम्यान यावेळी जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय. या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव सानू सागर गवइ आहे. या मुलीचे कुटुंब मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर रेल्वे मालधक्का नाशिक रोड येथे राहतंय. अपघातात ठार झालेली मुलगी सानू इयत्ता पहिलीमध्ये शिकत होती. शाळेतून आजोबासोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात MH 15 G V 7719 क्रमांकाच्या बसने चिमुरडीला चिरडलं.
दरम्यान या अपघातानंतर बस चालक हा तिथून फरार झाला आहे. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना माल धक्का परिसरात असलेल्या कामगारांना समजतात तेथील त्यांनी आगारात गर्दी केली होती. त्यानंतर अनेक नागरिकांनी आणि कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला सदरचा बस चालक कुठे फरार झाला. त्याला लपून ठेवले आहे की काय असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला दरम्यान यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
या अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचे कुटुंब अतिशय गरीब असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते भारत निकम रामबाबा पठारे तसेच राजाभाऊ वानखेडे यांनी केली त्याचप्रमाणे या अपघात प्रकरणी तातडीने बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.