Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News: दुर्देवी! कांदा विक्रीसाठी जाताना अपघात; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Nashik News Update: कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात, त्यामुळे ते रात्रीच बाजार समितीत कांदा घेवून निघाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अजय सोनवणे...

Nashik News: कांदा विक्रीसाठी बाजारात घेवून जात असताना भीषण अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील मृत शेतकरी एकनाथ सोनवणे हिंगणे - देहेरे येथून नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेवून जात होते. कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात, त्यामुळे ते रात्रीच बाजार समितीत कांदा घेवून निघाले होते.

यावेळी नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ चाळीसगाव कडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने पाठीमागून सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकनाथ सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात. एकीकडे शेतकऱ्यांना शेती मालाच्या दराने रडकुंडीला आणले असताना भीषण अपघातात जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT