Nashik : लाचखोर PSI ला ACB कडून अटक! सागर गायकवाड
महाराष्ट्र

Nashik : लाचखोर PSI ला ACB कडून अटक!

IPL च्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांकडून, ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात अटक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड 

नाशिक : नाशिक मधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीस ३ लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. महेश वामनराव शिंदे (वय- ३८) असे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सट्टयाप्रकरणी कारवाई न करणे आणि सट्टा सुरळीत सुरु ठेवणे. यासाठी पीएसआय असलेल्या शिंदेनी संजय आझाद खराडे नामक एका खासगी व्यक्तीच्या माध्यमातून मागील आठवड्यात शनिवारी या दिवशी ४ लाखांची लाच मागितली होती.

यानंतर तडजोडी अंती गुरुवारी या दिवशी ३ लाख रुपये लाच देण्याचे ठरले होते. दरम्यान, याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, नाशिकच्या एसीबीने ACB सापळा रचला आणि खासगी व्यक्ती असलेल्या संजय खराडे यास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

Success Story: स्वप्नपूर्ती! जिद्द, मेहनत अन् सातत्याच्या जोरावर क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; प्रदीप गोरड यांचा प्रेरणादायी प्रवास

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT