narayan rane Saam Tv
महाराष्ट्र

व्यस्त असलेल्या नारायण राणेंच्या बंगल्यावर अखेर पाेलिसच गेले

दूसरीकडे मंत्री नारायण राणे हे आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

अमोल कलये, संभाजी थोरात, अनंत पाताडे

सिंधूदूर्ग (sindhudurg) : कणकवली पोलिसांनी आज (गुरुवार) केंद्रीय नारायण राणे यांची त्यांच्या ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. काल नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजवर नारायण राणे यांच्या भेटीसाठी जे पोलिस कर्मचारी आले हाेते तेच आज पुन्हा बंगल्यावर येऊन गेले. राणेंची भेट घेऊन पोलिस बंगल्याचे बाहेर पडले. यावेळी माध्यमांनी बंगल्यात राणेंसमवेत काय चर्चा झाली असे पोलिसांना विचारले असता ते काही ही न बाेलता निघून गेले.

शिवसेना कार्यकर्ते संताेष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंना (nitesh rane) पाेलिस शाेधत आहेत. त्यातच मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश काेठे आहे मला माहित आहे पण हे तुम्हांला सांगायला मी मूर्ख आहे का असे वक्तव्य केले हाेते. त्याचा धागा पकडत गुरुवारी कणकवली पाेलिसांनी नारायण राणेंना पाेलिस (police) ठाण्यात दुपारी तीनला हजर राहण्यास संदर्भात नाेटीस बजावली हाेती.

राणेंनी आधी नाेटीस मिळाली नाही असे सांगितलं हाेते. काही कालावधीनंतर राणेंनी मी व्यस्त असल्याने येऊ शकत नाही व्हीसीद्वारे (video video conference) मी चाैकशीस सामाेरे जाईन असे म्हटलं हाेते.

दरम्यान आज सकाळी कणकवली पाेलिस मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यात येऊन गेले. पाेलिसांनी सध्या तरी त्यावर काहीच माहिती दिली नाही. दूसरीकडे मंत्री नारायण राणे हे आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Sanchar Saathi App: संचार साथी अ‍ॅप अनिवार्य नाही, प्री इन्स्टॉलचा केंद्र सरकारचा निर्णय मागे

Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

SCROLL FOR NEXT