नारायण राणे  SaamTv
महाराष्ट्र

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंची जन आशीर्वाद यात्रा; शिवसेनेचा विरोध

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्यासाठी नारायण राणे जाणार आहेत. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणे यांना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंना आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मैदानात जोरदार सक्रीय करण्याची खेळी चालवली आहे. याचाच भाग म्हणून राणेंच्या मुंबईतील जन आशीर्वाद यात्रेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. मात्र शिवसेनेकडून राणेंच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

आज नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी नारायण राणे आज सकाळी १० वाजता मुंबई विमातळावर दाखल होतील. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा वांद्रे, दादर, सायन, प्रभादेवी, परळ या शहरातील प्रमुख भागात असणार आहे.

सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पण या जन आशीर्वाद यात्रेसाठी निवडण्यात आलेल्या या जागा म्हणजे शिवसेनेचे प्राबल्य असणारी ठिकाणे आहेत. विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्यासाठी नारायण राणे जाणार आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणे यांना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय.

भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कात शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची जनआशीर्वाद यात्रा संघर्ष यात्रा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे परिसरात जागोजागी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT