Narayan Rane 
महाराष्ट्र

...म्हणून नारायण राणे गुन्हे शाखेत हजर झाले नाही

साम टिव्ही ब्युरो

- राजेश भोस्तेकर

रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांचे रविवारी रात्री तब्येत बिघडल्याने ते आज स्वतः अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहू शकत नाहीत अशा आशयाचे म्हणणे त्यांच्या वकीलांनी येथील पाेलिस अधिका-यांना दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन देताना महाड न्यायालयाने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले होते.

न्यायालयाच्या आदेशानूसार आज सकाळी ११ ते १२ यावेळेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः अलिबाग येथे हजेरी लावणे अपेक्षीत हाेते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने ते आले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांचे वकील ऍड.संदेश चिकणे यांनी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची भेट घेऊन मंत्री राणे यांच्या प्रकृती विषयी कल्पना दिली.

यावेळी वकीलांनी काही कागदपत्र सादर केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अंकीत बंगेरा हे उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT