Narayan Rane News Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane News: आदित्य ठाकरे आणि संजय राऊत लवकरच जेलमध्ये असतील; नारायण राणे यांचा मोठा दावा

Narayan Rane News: '१६ चे १६० करू? त्यासाठी जादूची कांडी आहे का? असा सवाल करत आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये असतील, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.

Vishal Gangurde

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Aaditya Thackeray vs Narayan Rane:

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी निवडणुकींचे वेध लागले आहे. याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी राज्यात १६ चे १६० आमदार होतील, असा दावा केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे.

'१६ चे १६० करू? त्यासाठी जादूची कांडी आहे का? असा सवाल करत आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये असतील, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना धारेवर धरलं. आदित्य ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, 'कोण आहे? मी त्यांना गांभीर्याने घेत नाही. यांची शिवसेना अधोगतीकडे येऊन पोहोचली आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरे, संजय राऊत जेलमध्ये असतील: नारायण राणे

'16 पैकी निवडणुकीत 5 पण येणार नाहीत. पक्षातील जे आमदार होते, ते दिवसा ढवळ्या पळून गेले. काही दिवसांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत जेलमध्ये सोबत असतील. यांना 160 जागा सुद्धा मिळणे कठीण आहे. ज्यांनी खोक्यांची डिलिव्हरी केली, त्यांच्यासमोर खोक्याचा विषय बोलू नये, असेही राणे म्हणाले.

'एकनाथ शिंदे पोहोचविणाऱ्या पैकी आहेत. घरी नेणाऱ्या पैकी नाहीत. 16 आहेत ना, पुढे एकही राहणार नाही. आता पाचही राज्यात भाजपची सत्ता येईल, असाही दावा राणेंनी केला आहे.

पाहुणे येतात, पाहुणे जातात : राणे

आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरूनही राणेंनी निशाणा साधला. 'कोकणात पाहुणे येतात त्यानंतर कोंबडी वडे खाऊन जातात. त्यांनी आजपर्यंत कोकणाला काय दिलं? आदित्य ठाकरे शिवसैनिकांना का बघत नाहीत? अवस्था बिकट आहे. जे शिवसेनेत आहेत, ते पद वाचवायला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाहीत, असा टोला राणेंनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT