Robbbery 
महाराष्ट्र

भ्रष्‍ट्राचाराची चौकशी पुर्ण होण्यापुर्वीच ग्रामपंचायतीतून कागदपत्रांची चोरी

भ्रष्‍ट्राचाराची चौकशी पुर्ण होण्यापुर्वीच ग्रामपंचायतीतून कागदपत्रांची चोरी

दिनू गावित

नंदुरबार : अक्‍कलकुवा ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी लागली होती. ही चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना ग्रामपंचायतीतून कागदपत्रांसह कंप्युटर, सीसीटीव्ही कॅमेरेही चोरीला गेल्याची घटना घडली आहे. (nandurbarn-news-akkalkuwa-grampanchayat-Theft-of-documents-even-before-completion-of-the-corruption-probe)

अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये रात्री चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला. ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीचे दप्तर तसेच ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, कंप्यूटर व सहित्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिस ठाण्याला सरपंच राजेश्वरी वळवी व प्रभारी ग्रामसेवक मनोज पाडवी यांनी दिली आहे.

हाकेच्‍या अंतरावर पोलिस स्‍टेशन

पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायतीत चोरी झाली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना या ग्रामपंचायतीतून ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अक्कलकुवा पोलीस प्रशासनातर्फे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाला गती देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

SCROLL FOR NEXT