Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: काही मिनिटातच होत्‍याचे नव्‍हते झाले; आगीत घर जळून खाक, कुटुंब उघड्यावर

काही मिनिटातच होत्‍याचे नव्‍हते झाले; आगीत घर जळून खाक, कुटुंब उघड्यावर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भुजगाव गावातील येथील घराला रात्री आग (Fire) लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिल पेचरा पाडवी यांचे संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेले असतांना घरात कोणी नसतांना (Nandurbar News) सदर घटना घडली. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य, महत्वाची कागदपत्रे आणि कपडेलत्ते जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. (Live Marathi News)

भुजगाव (ता. धडगाव) येथे झालेल्‍या आगीच्‍या घटनेत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात आगीचे लोड उठल्याने आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आले. यानंतर जवळपासच्या नागरिकांनी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनिल पेचरा पाडवी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.

कुटुंब उघड्यावर

धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशमक दलाला संपर्क केल्याने तात्काळ अग्निशमक दलाची दाखल होत संपूर्ण आग विझवली. तोपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, घराचे दांड्या लाकूडसह जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. सुनिल पाडवी या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे. अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त काहीही वाचले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. महसूल विभागाच्यावतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहॆ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT