Nandurbar Zp Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Zp :नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभेत विरोधक सत्याधारी एकमेकात भिडले; काँग्रेस आणि शिंदे गट सदस्यांचा सभा त्याग

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सभेचा अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही. त्यासोबत सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून मनमानी कारभाराच्या विरोधकांनी सभागृहातून सभा त्याग केला. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना देखील महत्त्वाच्या विषयावर विरोधकांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधकांची भूमिका चुकीची असल्याचा प्रत्यारोप केला आहे. यामुळे जोरदार खडाजंगी उडाली. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या सभेत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करण्यास सुरुवात केली. (Nandurbar Zp) यातूनच सभागृहात विरोधात वातावरण निर्माण झाले. याच वेळी सत्ताधारी काही सदस्यांनी विरोधी सदस्यांकडे माईक हिसकवण्याचा प्रयत्न केला. या झालेल्या वादावादीनंतर विरोधकांनी सभागृहातून सभा त्याग केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बोलावलेली सभा बेकायदेशीर असून या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सांगितले. 

नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील खराब रस्ते आरोग्य सेवा आणि यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सभेमध्ये चर्चा करायची होती. मात्र विरोधकांना या विषयाचे गांभीर्य नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालण्यात सुरुवात केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी केला आहे. तर जिल्हा परिषदेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले. आगामी काळातील राजकारण तापणार असल्याचं या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवरून सिद्ध झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT