Viral audio clip controversy triggers FIR against BJP leader Vijay Chaudhary in Nandurbar saam tv
महाराष्ट्र

भाजपच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; पक्षाच्या माजी खासदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप, व्हायरल ऑडियो क्लिपनंतर खळबळ

Vijay Chaudhary Audio Clip Controversy Nandurbar: नंदुरबारमध्ये व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण; डॉ. हिना गावीत यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप नेते विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल. एआयद्वारे छेडछाड केल्याचा दावा.

Omkar Sonawane

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबारमध्ये व्हायरल होणारे कथीत ऑडीओ क्लीप प्रकरण आता नव्या वळणावर पोहचले असून एका ऑडीओ क्लीपमध्ये भाजपाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या विरोधात अर्वाच्च संभाषण प्रकरणी आता भाजपचे प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज व्हायरल होणाऱ्या नवनवीन क्लीपस आणि त्यातील कथीत संभाषणाचे पाळंमुळं आता थेट मंत्र्यापर्यत देखील पोहचली असून अनेक मंत्र्यांचे देखील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल होत असून यावरुन नंदुरबारचे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्र चांगलंच ढवळून निघालं आहे.

नंदुरबारमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याशी निगडीत ऑडीओ क्लीप्स व्हायरल होत आहे. कधी अधिकारी, कधी पदाधिकारी तर कधी मंत्र्यांसोबतच्या या संवादाच्या ऑडीओ क्लीपांमुळे नंदुरबारच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या सर्व व्हायरल होणाऱ्या ऑडीओ क्लीप एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने छेडछाड करुन प्रसारित केल्या जात असल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला असून या प्रकरणी त्यांच्या मुलाने नंदुरबार पोलीसा ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलेला आहे.

अशातच आता भाजप नेते विजय चौधरी यांची मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबतच्या संवादाच्या कथीत क्लीपा देखील व्हायरल झाल्या असून या क्लीपमध्ये संभाषणावरुन आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या क्लीपामधून थेट आमदार विजयकुमार गावितांच्या कुटुंबालाच लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातही डॉ हिना गावितांबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाष्य करणारी एक कथीत क्लीप व्हायरल झाली असून यात थेट हिना गावितांबद्दल अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली आहे.

त्यामुळे या कथीत व्हायरल क्लीप प्रकरणी हिना गावितांचे चुलत भाऊ रोहण गावित यांच्या तक्रारीवरुन विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ तसेच अन्य कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉ. हिना गावितांच्या कार्यकर्त्यांमध्ये या कथीत क्लीप व्हायरल झाल्यानंतर रोष असून त्याच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी पोलीस स्टेशन तहसिल कार्यालय गाठून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तसेच विजय चौधरींची भाजपमधून हकालपट्टीची मागणी थेट पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भर पावसात भिंतींना रंग; पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी थांबवा – प्रमोद नाना भानगिरे

Iyengar Fresh Cake Bakery: खारीत उंदराचा वावर, केकमध्ये विष्ठा; अय्यंगार फ्रेश केक बेकरीतील किळसवाणा प्रकार

Tuesday Horoscope : थोरांचा सल्ला घ्या, ५ राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

VIDEO VIRAL : धावत्या ट्रेनमध्ये पंडितजींनी थाटली पूजा, एसी कोचमध्ये पेटवला दिवा अन्..., VIDEO होतोय व्हायरल

Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले

SCROLL FOR NEXT