Nandurbar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar: चक्क टँकर चोरी! आरोपीस पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या

टँकरवर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग, बलविंदरसिंग बलदेवसिंग दोन्ही रा. अमृतसर पंजाब यांना चालक म्हणून ठेवलेले होते.

दिनू गावित

नंदूरबार: शहादा येथील टँकर चोरीतील आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने पंजाबमध्ये अटक केली. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी 45 लाख रुपये किंमतीचे दोन टँकर पोलिसांनी हस्तगत केले आहे. तक्रारदार सुनिलसिंग रघुविरसिंग काला रा. हाऊस नंबर 44, धानेगांव ता.जि. नांदेड यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर हे नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यावर लावले होते ते विविध खांडसरीमधून मळी (मोलेसीस) भरुन लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यामध्ये वाहतुक करण्यासाठी त्यांनी टँकर भाडेतत्वावर लावलेले होते.

टँकरवर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग, बलविंदरसिंग बलदेवसिंग दोन्ही रा. अमृतसर पंजाब यांना चालक म्हणून ठेवलेले होते. परंतु दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी वरील दोन्ही इसमांनी सुनिलसिंग यांच्या मालकीचे दोन्ही टैंकर चोरुन नेल्याची घटना घडल्या नंतर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्यामुळे तसेच मालमत्तेची किमंत मोठी असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडे वर्ग केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करुन तात्काळ पंजाब राज्यात रवाना केले होते. पंजाबमधील अमृतसर सारख्या मोठ्या शहरात जावून फक्त नावाने शोध घेण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे होते.

अमृतसर येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपीताच्या पत्नीची माहिती काढून तिच्या घराच्या आजू - बाजुस वेषांतर करुन बातमीदारांचे जाळे निर्माण केले. पंजाबमधील अमृतसर सारख्या नवीन शहरात देखील अवघ्या काही दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीदार तयार करण्यात यश आले होते. तसेच पथक संशयीताच्या पत्नीच्या घराच्या आजुबाजुस रात्रंदिवस Api संदिप पाटील यांनी वेषांतर करून पाळत ठेवुन संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेत होते, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांच्या नावाशिवाय काहीही नव्हते त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या .

दि. 03 मार्च 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी त्याच्या घरी येणार आहे . बातमीप्रमाणे संशयीत आरोपी हा त्याच्या घरी सायंकाळी आला. त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालाख अशा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्षात येताच त्याने त्याठिकाणाहून पळ काढला सापळा लावून बसलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे 1 किमी पाठलाग करून बलविंदरसिंग बलदेवसिंग रा . काले ता पिथीपिंड जि . तरण तारण पंजाब यास ताब्यात घेतले.

त्याला शहादा येथील टँकर चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा दुसऱ्या साथीदाराबाबत केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहता येथे तो जाऊन जोबनप्रितसिंग याचा शोध घेत असताना त्याला पोलीस पाठलाग करीत असल्याचा संशय येताच पळून गेला. याबाबत बलविंदरसिंग बलदेवसिंग रा . काले ता.पिखीपिंड जि . तरण तारण, पंजाब यास शहादा येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT