Nandurbar Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Taloda News: भजन म्‍हणतानाच मृत्‍यूने गाठले; अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना निरोप देतानाची घटना

भोले बाबा ने बुलाया है..हे भजन म्‍हणतानाच मृत्‍यूने गाठले; अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना निरोप देतानाची घटना

साम टिव्ही ब्युरो

तळोदा (नंदुरबार) : भजन गात असतानाच भजनी मंडळातील सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळोद्यात घडली. शहरातून अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) जाणाऱ्या भाविकांना मिरवणुकीद्वारे निरोप (Taloda) देताना मेन रोडवरील काका शेठ मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Live Marathi News)

जम्मू– काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेसाठी तळोद्यातील भाविक आज (२६ जून) रवाना होणार होते. त्यासाठी मेन रोडवरील दत्त मंदिरापासून मिरवणुकीने भाविकांना निरोप देण्यासाठी शहरातील नागरिक जमा झाले होते. यावेळी श्री दत्त भजनी मंडळाच्या सदस्यांनी भजन कीर्तन करत भजनाद्वारे भाविकांना निरोप देताना वातावरण भक्तीमय बनवण्यास सुरुवात केली.

चक्‍कर येवून जमिनीवर कोसळले

भजनी मंडळातील सदस्य आनंदा नरोत्तम सूर्यवंशी हे भजन गात होते. 'भोले बाबा ने बुलाया है' असे भजन त्यांच्या तोंडून बाहेर येत होते. त्याचवेळी अचानक आनंदा सूर्यवंशी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. ते बघून सोबत असलेल्यांना धक्काच बसला. त्यांना तातडीने जवळच वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांचे रक्तदाब कमी होऊन त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

SCROLL FOR NEXT