Susari Dam Saam tv
महाराष्ट्र

Susari Dam : सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असून नदी, नाल्यांना पूर आले आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शहादा तालुक्यात आणि सातपुड्याच्या डोंगरांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी त्यावर असलेल्या धरणांच्या पाणी पातळींमध्ये वाढ झाली आहे. यात सुसरी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून धरणातून आता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा (Rain) जोर वाढला असून नदी, नाल्यांना पूर आले आहेत. हे पाणी धरणात जात असल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील नवलपुर शिवारात असलेल्या सुसरी प्रकल्प तुडुंब भरला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सुसरी नदीला देखील मोठा पूर आला आहे. 

धरणाच्या तीन पैकी दोन वक्र दरवाजे पूर्णतः उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सुसरी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे  नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात किंवा नदी काठावर जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT