Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याने चिमुकल्याला शेतात फरफटत नेले; शहादा तालुक्यातील घटना, मुलाचा मृत्यू

Nandurbar News : रोहित हा बुधवारी शेळ्या चारण्यासाठी गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत उसाच्या शेतात नेले. सोबतच्या दोन मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांना समजली

Rajesh Sonwane

शहादा (नंदुरबार) : शेळ्या चारण्यासाठी तिने मुले गेले होते. या दरम्यान बिबट्याने एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत मुलाला उसाच्या शेतात फरपटत नेले. सोबत असलेले दोन्ही मुलांसमोर घटना घडल्याने ते घाबरले व त्यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्या. दरम्यान या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. 

अंबापूर- राणीपूर रस्त्यावर रोहित गंगाराम मोरे हा आपल्या मावशीसोबत शेतातच झोपडीत राहत होता. (Nandurbar) दरम्यान रोहित हा बुधवारी शेळ्या चारण्यासाठी गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत उसाच्या शेतात नेले. सोबतच्या दोन मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांना समजली. घटनास्थळी राणीपूर, इस्लामपूर, लक्कडकोट येथील ग्रामस्थांनी धार घेत शोध सुरु केला. यानंतर पोलीस व वन विभागाला (forest department) याची माहिती देण्यात आली असता घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राणीपूरचे वनक्षेत्रपाल एम. बी. चव्हाण व कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

वन विभागाचे दुर्लक्ष 

दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्या वेळी राणीपूर ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती देत पिंजरा लावण्याबाबत कळविले होते. परंतु त्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले. अशातच बिबट्याने हल्ला केल्याने एका चिमुकल्याचा जीव गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT