Satpuda Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

Satpuda Sugar Factory: शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट नऊ महिन्यापासून थकीत; शहाद्याच्या साखर कारखान्याविरोधात करणार आंदोलन

Nandurbar News: शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट नऊ महिन्यापासून थकीत; शहाद्याच्या सातपुडा साखर कारखान्याविरोधात करणार आंदोलन

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: ऊस तोडणी केल्यानंतर शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याकडे नेत असतात. ऊस खरेदी करून साखर कारखानदार (Sugar Factory) शेतकऱ्यांचे पेमेंट थकीत ठेवत असतात. असाच प्रकार (Shahada) शहादा येथे घडला असून, गेल्या ऊस खरेदी करायला नऊ महिने झाल्यानंतर देखील अद्याप पैश्यांसाठी फिरवाफिरव करत आहेत. (Latest Marathi News)

शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना नागाई शुगर या कंपनीने चालवण्यासाठी घेतला आहे. सदर कारखान्याला जिल्ह्यातील आणि शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस दिला होता. सदर शेतकऱ्यांना गेल्या नऊ महिन्यापासून उसाचे पेमेंट न मिळाल्याने (Farmer) शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कंपनीच्या संचालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही त्यांचे थकीत पेमेंट देण्यात आलेले नाही.  

तर बेमुदत उपोषण 

शेतकरी या प्रकाराला कंटाळले असून येत्या १६ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना थकीत पेमेंट देण्यात आले नाही. तर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पेमेंट थकीत असलेले शेकडो शेतकरी आपल्या परिवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT