Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

Nandurbar News : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फोटो येऊ नये म्हणून चोरट्यांनी मंदिरास लागून स्टोअररूममध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बॉक्सच्या वायरिंग स्क्रू चावीचा वापर करत काढत बॉक्स लंपास

साम टिव्ही ब्युरो

शहादा (नंदुरबार) : शहादा शहराजवळ असलेल्या गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. या प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहादा (Shahada) शहरातील मंदिरात चोरी करण्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आठवडाभरातील ही चौथी घटना आहे. दरम्यान १५ मे रोजी पहाटे पाचच्या अगोदर बायपास रस्त्यालगत असलेल्या गोकर्णेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप लोखंडी (Crime News) सळईने चोरट्यानी वाकविले. मंदिरात प्रवेश करत गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या दानपेटीत भाविकांनी दान स्वरूपात टाकलेली रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. 

चोरी करताना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात फोटो येऊ नये म्हणून चोरट्यांनी मंदिरास लागून स्टोअररूममध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बॉक्सच्या वायरिंग स्क्रू चावीचा वापर करत काढत बॉक्स लंपास केला. यामुळे पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज नसल्याने चोरट्यांचा शोध घेणे आता आव्हान उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT