Shahada Accident Saam tv
महाराष्ट्र

Shahada Accident : कार- डंपरचा भीषण अपघात; कार थेट शेतात जाऊन कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

Nandurbar News : हरजीत हे सकाळी कामानिमित्ताने शहादा येथून बाहेर जाण्यासाठी कारने निघाले होते. कारने महामार्गावरून जात असताना करजई टोलनाक्याजवळ वाळू डंपरशी समोरासमोर धडक झाली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शहादा प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर आज सकाळी दहाच्या भरधाव डंपर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डंपरने दिलेल्या धडकेत कार थेट रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पलटी झाली आहे. दरम्यान अपघातात कारमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

शहादा प्रकाश रस्त्यावरील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील करजई टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहादा येथील रहिवासी असलेले हरजीत सिंग राजपाल (वय ६०) असे यांचा मृत्यू झाला आहे. हरजीत हे सकाळी कामानिमित्ताने शहादा येथून बाहेर जाण्यासाठी कारने निघाले होते. कारने महामार्गावरून जात असताना करजई टोलनाक्याजवळ वाळू डंपरशी समोरासमोर धडक झाली. 

धडकेत कार शेतात जाऊन कोसळली 

वाळूने भरलेल्या डंपरची धडक इतकी जोरात होती की धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली दूर अंतरावर जाऊन शेतात कोसळली. यात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून हर्जित सिंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर शेतशिवार काम करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हरजीत सिंग राजपाल हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व असल्याने सर्वांचे परिचित होते. यामुळे त्यांना स्थानिकांनी लागलीच बाहेर काढत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. 

महामार्गावर वाहतूक कोंडी 
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिस अधिक तपास करत असून डंपर चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT