Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News: शहादा दंगल.. दोन्ही गटातील १५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे; ३५ जणांना अटक

Shahada News : शहादा दंगल.. दोन्ही गटातील १५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे; ३५ जणांना अटक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: शहादा शहरातील कुकडेल परिसरात बॅनर पाडण्याच्या वादातून दोन गट समोरासमोर येत दगडफेक करण्यात आली होती. घटनेला दोन दिवस झाल्यानंतर देखील (Shahada) शहादा शहरात कडक पोलीस बंदोबस्त आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Police) दोन्ही गटातील १५० जणांवर गुन्हे दाखल केले असून ३५ जणांना अटक केली आहे. (Tajya Batmya)

शहादा शहरात दोन दिवसांपूर्वी दोन गट समोरासमोर आल्याने दंगल उसळली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी शहादा पोलिसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन गुन्ह्यात दीडशेपेक्षा अधिक आरोपी असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून अटक सत्र सुरू आहे. दोन दिवसानंतर ही (Crime News) शहादा शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी  तळ ठोकून आहेत. 

अफवा पसरविणाऱ्यांवर नजर 

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर (Nandurbar) विश्वास ठेवू नये; असे आव्हान जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. शहादा शहरात शांतता असून समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस दलाच्या वतीने नजर ठेवली जात आहे. शहरातील सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांना शांततेच्या आव्हान करण्यात आले असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT