Shahada Accident Saam tv
महाराष्ट्र

Shahada Accident : क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले; भरधाव ट्रकची घराला धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात पहाटेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. सकाळी सकाळी तयारी करून कामावर जाण्याची तयारी सुरु होती. याचवेळी काळाने झडप घातली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ G वर भीषण अपघात झाला. यात एक भरधाव ट्रकने घराला जोरदार धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर सदर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप दिसून येत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात पहाटेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. सकाळी सकाळी तयारी करून कामावर जाण्याची तयारी सुरु होती. याचवेळी काळाने झडप घातली. ब्राह्मणपुरी गावातील संजय ठाकरे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर जनाबाई ठाकरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गावातील नागरिकांनी लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले 

दरम्यान ठाकरे यांचे महामार्गाला लागूनच घर आहे. दरम्यान सकाळी घरात कामाची लगबग सुरु असताना होत्याचे नव्हते झाले. महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने घराला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय ठाकरे जागीच ठार झाले आहेत. तर जनाबाई ठाकरे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की अपघातात घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. तसेच बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी आणि मालवाहू गाडीचे देखील यात नुकसान झाले आहे.  

घराचे छप्पर गेले 

सदरच्या घटनेत ठाकरे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दुःखासोबत घराचे छप्पर गेल्याचेही संकट आले आहे. घराला धडक दिल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. तर अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT