Prakasha News Saam tv
महाराष्ट्र

Prakasha News: निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात भरले पाणी; प्रकाशा परिसरात पावसासाठी साकडे

Nandurbar News : निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात भरले पाणी; प्रकाशा परिसरात पावसासाठी साकडे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदूरबार : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुठेजी पाऊस पडलेला नाही. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी वरुण देवाला आराधना केली जात आहे. याच दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश (Prakasha) येथे पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले. (Tajya Batmya)

साधारण महिनाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) डोळे आकाशाकडे आहेत. पाऊस नसल्याने पीक करपण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या ही समोर येऊ लागली आहे. आता पाऊस आला नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होणार आहे. 

महादेव मंदिरात भरले पाणी 

पिकांना जीवदान मिळावे आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून प्रकाशा येथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी पुरातन निळकंठेश्वर महादेव मंदिरात पाणी भरले असून देवाला पाण्यासाठी साकडे घातले आहे. ग्रामस्थांनी पाण्यासाठी देवाला साकडे घातले असून या ठिकाणी जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही; तोपर्यंत मंदिरातील पाणी काढणार नाहीत असा संकल्प त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT