नंदुरबार : महाशिवरात्रीच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा SaamTvNews
महाराष्ट्र

नंदुरबार : महाशिवरात्रीच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा

काल महाशिवरात्रीनिमित्त राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधेमुळे (Food Poisoning) अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र, उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ४० जणांवर राकसवाडे (Rakaswade) आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी राकसवाडे येथेच तळ ठोकून आहेत.

हे देखील पहा :

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) राकसवाडे येथे ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होऊ लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

राकसवाडे येथे ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच नंदुरबार येथून तहसिलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी पथकासह दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत सर्व तहसिलदारांसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी राकसवाडे येथेच तळ ठोकून होते. काल रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास १३४ जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, ४० जणांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच सलाईन लावण्यात आली होती.उर्वरित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही रुग्णाला (Patient) अधिकचा त्रास न झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार करण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, कोणालाही अधिकचा त्रास झाल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT