महाराष्ट्र

समितीला आढळले मुदत संपलेले ओआरएस व औषधी; नंदुरबार जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार

समिती आढळले मुदत संपलेले ओआरएस व औषधी; नंदुरबार जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विधान मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क समितीची आश्रम शाळा, पोषण केंद्र, अंगणवाड्या तसेच विविध शासकीय यंत्रणेची पाहणी दौरा केला. पाहणीनंतर आढळून आलेल्‍या त्रुटीवरून यंत्रणेला धारेवर धरले. (nandurbar-news-women-and-child-devlopment-Committee-found-expired-ORS-and-drugs)

विधान मंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने तळोदा, शहादा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात भेट देऊन विविध शासकीय यंत्रणेची पाहणी करुन यंत्रणेला धारेवर धरले. अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयातील बाल पोषण केंद्र, बसस्थानकावरील महिला मदत कक्ष तसेच हिरकणी कक्ष, सोरापाडा येथील बालिकाश्रम, देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडी केंद्राला समितीने भेट देऊन पाहणी केली. विधानमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमन पाटील, आमदार यामिनी जाधव यांचा समितीत समावेश होता.

अधिकारी, कर्मचारी होते अटेन्‍शनमध्‍ये..

गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात विधान मंडळाची समिती पाहणीसाठी येणार असल्यामुळे नागरिकांत कुतुहल आणि प्रशासनस्तरावर युद्धपातळीवर तयारी सुरु होती. प्रशासनाच्यावतीने समितीला कुठे पाहणीसाठी न्यावे याबाबत खलबते करुन पाहणीचे ठिकाणे आणि दौरा निश्चित करण्यात आला होता. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे 'अटेन्शन'मध्ये होते. दरम्यान अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयातील बाल पोषण केंद्राची पाहणी करत येथील सोयी सुविधांची माहिती घेतली.

मुदत संपलेले ओआरएस व औषधी

दरम्यान केंद्रातील उपलब्ध औषधसाठ्याची पाहणी करत असतांना एका कपाटात मुदत संपलेली ओआरएसचे पाकिटे आढळली. तसेच काही औषधांची मुदत ही या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार असल्याने मुदत संपणाऱ्या औषधांचे पुढे काय करणार याबाबत विचारणा केली. रुग्ण कक्षाच्या बाहेरील परिसरात अस्वच्छता दिसुन आली एकंदरीत दोन्ही मुद्यांमुळे समितीने अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. त्यानंतर समितीने बसस्थानकातील महिला मदत केंद्र तसेच हिरकणी कक्षाला भेट दिली. येथे आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी समितीला माहिती दिली. समिती येणार असल्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मदत केंद्राची साफ सफाई करण्यात आली त्यामुळे समितीने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.

बालिकाश्रमाला भेट

सोरापाडा येथील बालिकाश्रमला समितीने भेट देऊन मुलींसोबत चर्चा केली याठिकाणी उपलब्ध संसाधनांची माहिती घेतली. येथील धान्य कोठारातील तसेच स्वयंपाक घरातील थोडया अस्वच्छते बाबत नाराजी व्यक्त केली. देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडी केंद्राला समितीने भेट दिली. समितीने अंगणवाडी केंद्रातील स्वयंपाक घराची पाहणी केली दरम्यान पोषण आहार आणि आहाराचे वेळापत्रक याबाबत आवश्यक सुचना दिल्यात. दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यात समितीला प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत जिल्हाधिकाार कार्यालय, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT