Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : धक्कादायक ! पहिले आठ किलोमीटर झोळीतून नेलं! नंतर नदीपात्राजवळ सासूनेच केली सुनेची प्रसुती

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांची सुविधा झालेली नाही. यामुळे कोणत्याची प्रकारच्या सुविधा या भागांमध्ये पोहचू शकत नाही.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आजही मरण यातना संपत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. रस्त्यांची सुविधा नसल्याने आरोग्य सेवा पोहचत नाही. यामुळे रुग्णाला अगदी झोळीत टाकून पायपीट करत न्यावे लागत असते. यात खुटवडा ते कुडब्यापाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. अशात आज एका गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांची सुविधा झालेली नाही. यामुळे कोणत्याची प्रकारच्या सुविधा या भागांमध्ये पोहचू शकत नाही. अशाच प्रकारे अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असतो. 

बांबूची झोळी बनवून आठ किलोमीटरची पायपीट

अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावातील गर्भवती असलेल्या महिलेला रात्री बारा वाजेपासून त्रास सुरू झाला होता. मात्र जाण्यासाठी सुविधा नसल्याने सकाळ होण्याची वाट पहिली. पहाटेपर्यंत त्रास सुरू होता. गावाकडे जायला रस्ता नसल्यामुळे बांबूची झोळी बनवून नातेवाईकांनी नदी पार करावी लागली. साधारण आठ किलोमीटर पायपीट करावी लागली. इतकेच नाही तर नदीतील पूर पार केल्यानंतर नदीपात्राजवळच अधिक त्रास झाल्याने रस्त्यातच प्रस्तुती झाली. त्यानंतर महिलेसह नवजात बाळाला एका वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले. आता  राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेवर उपचार सुरू आहेत. 

स्थानिक आमदाराच्या लक्ष देतील का? 

गावापर्यंत रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नाही. गावाकडे जायला रस्ता नाही नद्यांना पूल नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस बांबूची झोळी करून रुग्णालय गाठावं लागत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहण्यास मिळते. बांबूची झोळी पकडायला जर कोणीच नसलं तर आम्ही करायचं काय? स्थानिक आमदार आमच्या या अडचणींकडे कधी लक्ष देणार ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT