Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: रेशन मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त; भर पावसात काढला मोर्चा

Nandurbar News रेशन मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त; भर पावसात काढला मोर्चा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या बिजरी गव्हाण येथील (Ration) रेशन दुकानदार गेल्या सहा ते सात महिन्यापासून ग्रामस्थांना रेशनच देत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) मोर्चा काढला. (Latest Marathi News)

रेशन मिळत नसल्याने थेट नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यापर्यत पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी या मोर्चातून आपला रोष व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यात गावात फक्त एकदाच रेशन वाटप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रेशन दुकानदाराचे परवाना तात्काळ स्थगीत करुन अन्य यंत्रणेमार्फत रेशन लागलीच उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.

अपुरे रेशन देवून पुर्ण (Nandurbar) रेशनवर सही घेणे, महिनोमहिने रेशनचा पुरवठा न करणे. अशा अनेक तक्रारी निवेदनातून ग्रामस्थांनी केल्या आहे. भरपावसात निघालेल्या या मोर्चातील ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे याठिकाणच्या रेशन दुकानदारांच्या वर झालेले आरोप पाहता याबाबत प्रशासनाने शहानिशा करने आवश्यक असल्याच मत व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सापडली बेवारस बॅग, सीसीटीव्ही VIDEO समोर

Shubman Gill: नशीबात असलेलं कोणी हिरावू शकत नाही...! टी-२० वर्ल्डकपमधून वगळल्यावर शुभमन गिलने सोडलं मौन

Ayodhya News : अयोध्या धाम आणि पंचक्रोशी परिक्रमा मार्गावर ऑनलाईन मांसाहारी फूड विक्रीवर बंदी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT