Nandurbar Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Unseasonal Rain: नवापूरात सकाळपासून तुफान पाऊस

नवापूरात सकाळपासून तुफान पाऊस

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : आठवडाभरापासून राज्‍यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर (Navapur) शहरात सकाळी आठ वाजता सुमारास जोरदार अवकाळी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. (Breaking Marathi News)

हवामान विभागाच्‍यावतीने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्‍यानुसार राज्‍यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. कुठे गारपीट तर कुठे मुसळधार पाऊस होत असल्‍याने बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी (farmer) नाराज असल्याचे चित्र देखील आहे. लवकर नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पावसाच्‍या थैमानात नुकसान

अर्धा तास पडलेल्या पावसामुळे नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी असलेल्या वीट भट्टीधारांचे नुकसान झाले आहे. तर बळीराजा देखील या अवकाळी पावसाने हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कंबर्ड मोडल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Ukraine : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर हल्ला, ड्रोन हल्ल्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान

Thackeray Brothers: मतचोरीविरोधात ठाकरे बंधू मैदानात, कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश

Jalgaon News: जळगावात ६४ विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्यात विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन

Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला

SCROLL FOR NEXT