Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: एका ठिणगीने दोन संसारांची राख; दोन्‍ही परिवार उघड्यावर

एका ठिणगीने दोन संसारांची राख; दोन्‍ही परिवार उघड्यावर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील मोगराणी गावात २ घरांना अचानक आग (Fire) लागून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत (Nandurbar News) दोन्‍ही घर जळून खाक झाले. यात धान्यासह घरगुती सामान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत देण्याची मागणी होत आहे. (Letest Marathi News)

मोगराणी (जि.नंदुरबार) गावातील रहिवासी लक्ष्मण सामा वळवी व लालसिंग अर्जुन पाडवी यांची घरे एकत्र होती. सुरुवातीला एका घराला आग लागल्यानंतर उष्णता व हवेमुळे आगीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने दोन्ही घरे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये घरातील धान्य, कपडे, घरगुती सामान व फर्निचर लाकडी दांड्या, खांबे सर्व जळून भस्म झाले आहे.

दोन्ही परिवार उघड्यावर

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी भीषण होती की आग विझविणे कठीण झाले. धान्यासह कपडे व सर्व संसार उपयोगी वस्तू आगीमुळे जळून खाक झाल्याने दोन्ही परिवार उघड्यावर आले आहे. घरांना आग लागल्यानंतर नागरिकांनी बाहेर पडून आपला जीव वाचविला त्यामुळे जीवित हानी टळली आहे.

मदतीची आस

गावातील ज्येष्ठ नागरिकांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन सदर कुटुंबांना महसूल विभागाने पंचनामा करून मदत द्यावी; अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अचानक लागलेल्या या आगीत घरातील सर्वसामान जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT