Khandbara Rural Hospital Saam tv
महाराष्ट्र

Khandbara Rural Hospital : दारूच्या नशेत डॉक्टराकडून उपचार; नातेवाईकांकडून आरोप, खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

Nandurbar News : खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक समोर आला असून दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. येथे दाखल रुग्णावर उपचार करत असताना चुकीच्या जागी इंजेक्शन लावल्याने डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला आहे. या वादानंतर दारूच्या नशेत डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. याठिकाणी सोयी सुविधा पुरविल्या जातात. अशात नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक समोर आला असून दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

रुग्णाला चुकीच्या जागी इंजेक्शन 

खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दारूच्या नशेत उपचार करत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला जात आहे. दरम्यान डॉक्टरांनी वारंवार चुकीच्या जागी इंजेक्शन दिल्यानंतर याचा जाब विचारला असता डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. तर या वादाचा संपूर्ण व्हिडिओ हा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

चौकशी सुरु 

ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण प्रकाराबाबत नंदुरबार जिल्ह्याच्या शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांच्याशी संपर्क साधला असता या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात डॉक्टर दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. मात्र या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

Rahul Gandhi Protest: राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन चिघळलं, PHOTO

Wednesday Horoscope : संयम ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींचे कामाचे मार्ग मोकळे होणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT