Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : दारू पिऊन रुग्णावर उपचार; डॉक्टरची तडकाफडकी बदली, सामच्या बातमीचा दणका!

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्यावरून रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात वाद झाला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णावर उपचार करत असताना चुकीच्या जागी इंजेक्शन लावण्यात आले होते. दारूच्या नशेत डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची बातमी 'साम टीव्ही'ने प्रसारित केल्यानंतर सदर डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश काढण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्यावरून रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात वाद झाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दारू पिऊन उपचार करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. 

व्यसन केले नसल्याचा दावा 
दरम्यान सदर प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असताना याबाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं असून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला होता. मात्र डॉक्टरने कुठल्याही प्रकारचे व्यसन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

डॉक्टरच्या बदलीचे आदेश  

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर दारूच्या नशेत बोलत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आरोग्य यंत्रणेकडून डॉक्टरने व्यसन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र शिक्षा म्हणून संबंधित डॉक्टरांची मोलगी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ बदली करण्यात आली असल्याची माहिती डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT