Toranmal  Saam tv
महाराष्ट्र

Toranmal : तोरणमाळला पर्यटकांना अनुभवता येणार जीप लाईनचा थरार; जीप लाईन ट्रायल यशस्वी

Nandurbar News : पावसाळ्याच्या दिवसात निसर्गरम्य वाटणाऱ्या या पर्यटनस्थळी अधिक गर्दी होत असते. दरम्यान येथे नंदुरबार वन विभागामार्फत तोरणमाळ पर्यटनस्थळी प्रस्तावित जीप लाईन प्रकल्पाची ट्रायल चाचणी यशस्वी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. याठिकाणी आतापर्यटकांसाठी जीप लाईनची व्यवस्था करण्यात आली असून याची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता येथे येणाऱ्या पर्यटकांना रोमांचक जीप लाईन राईडचा आनंद घेता येणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अनुभव वेगळा राहणार आहे.  

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आहे. याठिकाणी वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने फिरस्तीसाठी येत असतात. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात निसर्गरम्य वाटणाऱ्या या पर्यटनस्थळी अधिक गर्दी होत असते. दरम्यान येथे नंदुरबार वन विभागामार्फत तोरणमाळ पर्यटनस्थळी प्रस्तावित जीप लाईन प्रकल्पाची ट्रायल चाचणी यशस्वीरित्या पडली पार पडली आहे. 

साहसपूर्ण अनुभव घेता येणार 

येथे आता पर्यटकांना एक नवीन अनुभव अनुभवता येणार आहे. नुकताच नंदुरबार वन विभागामार्फत तोरणमाळ पर्यटनस्थळे प्रस्तावित जीप लाईन प्रकल्पाची ट्रायल चाचणी यशस्वीरित्या पार करण्यात आले आहे. उपक्रमामुळे पर्यटकांना साहसपूर्ण अनुभव मिळणार असून तोरणमाळ पर्यटनात आणखी एक आकर्षण जोडले जाणार आहेत. 

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बाकी 
रोमांचकारी उपक्रमामुळे पर्यटकांना साहसपूर्ण अनुभव मिळणार असून तोरणमाळ पर्यटनात आणखी एक आकर्षण जोडले जाणार आहे. आता उर्वरित कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करून ही सुविधा पर्यटकांसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे काही दिवसांची प्रतीक्षा पर्यटकांना राहणार असून साधारण हिवाळ्यात हि जीप लाईन सुरु होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT