Sarangkheda Saam tv
महाराष्ट्र

प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : तीन– चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात पाऊस होत असल्‍याने हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडली आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. यात प्रकाशा आणि सारंगखेडा (Sarangkheda) बॅरेजचे प्रत्येकी तीन दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदी (Tapi River) पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. (nandurbar news Three gates of Prakasha Sarangkheda Barrage opened)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीत शहादा तालुक्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा (Prakasha) येथे शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बॅरेजेमध्ये तापी नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे सारंगखेडा आणि प्रकाशा दोन्ही बॅरेजेमधून प्रत्येकी तीन गेट पूर्ण क्षमतेने खुले करून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नागरीकांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार जिल्‍ह्यात पावसाची संततधार सुरू असल्‍याने सर्वच नदींना पुर आला आहे. यामुळे जिल्‍ह्यातील अनेक भागात पुरस्‍थीती आहे. यात तापी नदीला पुर असल्‍याने नदी काठावरील नागरिकांनी नदी किनारी जाऊ नये; सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT