Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : जादूटोणा करण्याच्या संशयावरून जीवे मारण्याची धमकी; महिला गेली गाव सोडून, अंनिसच्या मदतीने पोलिसात तक्रार

Nandurbar News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील वाडे- पाडा वस्तीवर आजही अंधश्रद्धेला वाव दिला जात असतो. हे प्रकार सातत्याने समोर देखील येत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही डाकीण ठरवून त्रास देण्याचा घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना धडगाव तालुक्यातील वावी गावात समोर आली आहे. डाकीण असून जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून गावातील काही मंडळी महिलेला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून महिलेला अखेर गाव सोडून जावे लागले आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील वाडे- पाडा वस्तीवर आजही अंधश्रद्धेला वाव दिला जात असतो. हे प्रकार सातत्याने समोर देखील येत आहेत. (Nandurbar) दरम्यान धडगाव तालुक्यातील वावी या गावातील बालदिबाई ठाकरे ही महिला डाकीन असून ती गावातील लोकांना जादूटोना करते. ती जादूटोणा करत असल्याने गावातील लोक सतत आजारी पडतात; असा आरोप करत कागडा ठाकरे, आमशा ठाकरे यांनी सदर महिलेला वारंवार त्रास दिला जात होता. इतकेच नाही तर सदर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. 

अंनिसच्या मदतीने पोलिसात तक्रार 

गावात होणाऱ्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून सदर महिला गाव सोडून निघून गेली होती. मात्र तरीही त्रास सुरू असल्याने सदर महिलेने (ANIS) अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदत मागितली. त्यानंतर शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांची भेट घेऊन सदर प्रकार सांगत तक्रार केली. पोलिसांनी सदर प्रकरणात कारवाईची अश्वासन दिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT